औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची

येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भंडारा, दि. 10 : महिला दिनाला मुलींची आय. टी.आय.भंडारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला प्रशिक्षणार्थी तसेच महिला कर्मचारी यांच्याकरिता डॉ. विनया लांजेवार (एम.बी.बी.एस. एम.डी. Gyn.) यांचे महिलांचे आरोग्य व आहार या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते. तसेच चंद्रशेखर डोळस  (एस. पी. ऑफिस भंडारा) यांचे प्रशिक्षणार्थी करिता Self-defence यावर प्रशिक्षण सत्र सुद्धा घेण्यात आले.

            ह्या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. खारोडे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मृणालीनी मुनेश्वर (महिला व मुलांकरिता दक्षता कक्ष पोलीस मुख्यालय भंडारा जिल्हा समन्वयक तथा समुपदेशक भंडारा) ह्या उपस्थित होत्या. यावेळी माजी प्रशिक्षणार्थी व उद्योजिका हेमलता मोटघरे यांचे स्वागत करण्यात आले. सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थीच्या सहकार्याने महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.