केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनु. जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनु. जाती व

नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबत

  • योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

   भंडारा, दि.7 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना आणली आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजक यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत सबसिडीच्या अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. यासाठी प्रकल्प कर्ज मंजूर पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क करावा. असे आवाहन सुकेशिनी तेलगेाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले आहे.