धनगर समाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाकरिता अर्ज आमंत्रित

धनगर समाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाकरिता अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 7 : धनगर समाज (भज – क) या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाचे मूळ प्रवाहात येता यावे या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य ग्रामीण भागातील धनगर समाजातील घटकांसाठी राज्यात धनगर समाज घरकुल योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सदर घटकांतील समाजबांधवांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीला संपर्क साधून वैयक्तिक त्वरित परिपूर्ण अर्ज सादर करण्याबाबत सुकेशीनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी आवाहन केले.