चंद्रपूर I शिवजयंतीचे औचित्य साधत माजी सैनिकांचा सत्कार

शिवजयंतीचे औचित्य साधत माजी सैनिकांचा सत्कार
चंद्रपूर
शहरातील भिवापूर वॉर्ड येथील नवचैतन्य शारदोत्सव मंडळ 
यांच्या मार्फत एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली.
शिवप्रेमींनी शिवगर्जना करत शिवमुर्तीला वंदन करत मंडळाने कोणताही वाजा गाजा न करता शिवजयंती साजरी केली. विशेष म्हणजे या मंडळाने आमचा मावळा हाच म्हणत भारतीय सैन्यात 19 वर्ष सेवा देऊन सेनेतून निवृत्त झालेल्या भिवापूर वॉर्डातील रहिवासी जयेश बंडुजी आस्कर यांचा सत्कार केला.जयेश आस्कर यांनी 2003 साली सैन्यात भरती झाल्यानंतर अतिशय कठीण काळ सैन्यात घालवला, उत्तर – पूर्व भारतात त्यांनी स्वतःला  देश सेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भिवापूर वॉर्ड येथील नवचैतन्य शारदोत्सव मंडळामार्फत त्यांना शाल, श्रिफळ देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.यावेळी संपूर्ण आस्कर परिवार उपस्थित होते. सोबतच वॉर्डातील गणमान्य नागरिक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.