मार्कंडा देवस्थान विकास कामाचे भूमिपूजन लवकरच सुरु होणार खासदार अशोक नेते.

मार्कंडा देवस्थान विकास कामाचे भूमिपूजन लवकरच सुरु होणार खासदार अशोक नेते.

दि.२५ डिसेंबर २०२३

गडचिरोली:-खासदार अशोक नेते यांनी नुकतेच दिल्लीत झालेल्या अधिवेशन दरम्यान दिल्लीतील उप महानिदैशक पुरातत्त्व विभाग व निर्देशक कन्ट्रक्शन बांधकाम यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकी दरम्यान
मटेरियल व लेबर या दोन टेंडर संबंधित चर्चा करण्यात आली. त्यापैकी मटेरियल टेंडर हा पूर्णपणे प्रोसेसिंग झालेला आहे. लेबर टेंडर लवकरच अवघ्या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होणार अशी माहिती दिल्लीवरून पुरातत्त्व विभागाकडून पत्रांअन्वये व चर्चे दरम्यान खासदार अशोक नेते यांना माहिती दिली असता अवघ्या एक महिन्यातच मार्कंडा देवस्थानच्या विकास कामाचे लवकरच भूमिपूजन होणार व महाशिवरात्रि निमित्त येणाऱ्यां भाविक भक्तांना याचा मोठया प्रमाणात फायदा होणार अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथुन दिली.