५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट – वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ

५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट – वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ

 

चंद्रपूर २२ नोव्हेंबर – स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागातील ५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाने ठेवले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ सहभागी असून स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात तुकुम प्रभागात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाच्या वतीने दररोज स्वच्छता मोहीम राबविल्या जात असुन नागरीकांचा जबरदस्त प्रतिसाद मोहीमेस मिळत आहे. स्पर्धा जरी ३० नोव्हेंबर पर्यंतच असली तरी त्यानंतरही मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील विविध चौक, मोकळ्या जागा स्वच्छ केल्या जात आहेत, प्रत्येक दुकानात मी प्लास्टीक थैली वापरणार नाही, कापडी थैली वापरणार या स्वरूपाचे स्टीकर लावले जात आहे. आवश्यक ठिकाणी डस्टबीनचे वाटप केले जात असुन घरच्या घरी कंपोस्ट खत कसे तयार करावे याचेही प्रशिक्षण दिल्या आहे. टाकाऊपासून टिकाऊ मोहीमेअंतर्गत जुन्या टायरपासुन तसेच रिकाम्या काचेच्या बाटल्यांपासुन सुंदर कलाकृती देखील तयार केली गेली आहे.

मोहीमेस मंजुश्री कासनगोट्टूवार,विजय चीताडे, पुरुषोत्तम सहारे,धर्माजी खंगार,नारायण पतरंगे,वसंतराव धंदरे,गोकुलदस पिंपळकर,सुरेश कनोजवार,रश्मी सोनकुसरे,रामराव धारने,ज्योती कुंभारे,मंजुषा ताजने,कविता कडस्कर्,संगीता खंगार,विजय ढवरे,प्रभाकर भोंग,संजय कोट्टावार,भरतलाल सुरसाऊत,भास्कर इसनकर,भास्कर भोकरे,विजय ठाकरे,आनंदराव मांदाडे, प्रणाली येरपूडे,अर्चना मोरे,लता जांभूळकर,भालचंद्र वानखेडे,

सिंधू चौधरी,दीपा नागरीकर,,गीता तूरानकर,गीता भिमटे,बबनराव अन्मुलवार, विश्वनाथ राठोड,प्रमोद पागाडे,देवराव बोबडे,बबनराव धर्मपुरीवार,अशोक संगिळवार, सुनंदा बांदुरकर,अमोल तंगड पल्लिवर, पुरुषोत्तम सहारे,देवराव लाकडे, राजेंद्र सारडा,माया पारखी,इंदू फुलकर, शुभम देशभ्रतार, इम्तियाज अन्सारी,अाण्याजी ढवस,सुमित चहारे, खुशाल कावडे,निखिल,मंगेश कुर्वे,गौरव कसारे, अक्षय राठोड,सजल सुले,सीमा मडावी,प्रीती दडमल, अरविंद मडावी,प्रीती दडमल,राजेश वाहाडे,श्रीराम टोकेकर,गजानन, तुरेनकर, भारती खोब्रागडे, मनोहर पेंदाम,अरुणा चौधरी, लकडे,इत्यादी अनेक नागरीकांचा सहभाग उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.