सिंदेवाही तालुक्यातील शिवसेना कार्यकारणी लवकरच जाहीर करणार – संपर्क प्रमुख सपकाळ

सिंदेवाही तालुक्यातील शिवसेना कार्यकारणी लवकरच जाहीर करणार – संपर्क प्रमुख सपकाळ
उडाले ते कावळे राहिले ते मावळे , भुतकाळाचं विचार नं करता भविष्याचा विचार करा – मनीष जेठाणी
शिवसेना मुलं मंत्र विसरु नका विस टक्के राजकारण तर अंशी टक्के समाजसेवा करा – मुकेश जीवतोडे
शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम तसेच जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या सुचने नुसार ब्रम्हपुरीं विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात,युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी यांचा ब्रम्हपुरी विधानसभा दौरा.
सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शिवसैनिकांची केली विचारपूस जे पदाधिकारी पक्षाच्या कामात हातभार लावणार नाही अशां पदाधिकारी यांना पदावरून पायउतार करणार अशी तंबी ब्रम्हपुरीं विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सपकाळ यांनी दिली आहे.
तालुक्यातील पदाधिकारी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख तथा शिवसैनिक यांचा कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद भांनारे
वरोरा नगर पालिका नगर सेवक दिनेश यादव,नेताजी गहाणे तथा शेकडो च्या संखेने शिवसैनिक उपस्थित होते