शिवजयंती व भीमजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी देवुन सहकार्य करावे ऑल इंडिया पँथर सेनेने दिलं निवेदन

शिवजयंती व भीमजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी देवुन सहकार्य करावे

ऑल इंडिया पँथर सेनेने दिलं निवेदन

सिंदेवाही- तालुक्यात १९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव तथा १४ एप्रिल भिम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यास विना अतिशर्तीवर परवानगी देण्यात यावी.करीता तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिंदेवाही यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेत तहसीलदार साहेब यांनी आपल्या स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित आक्रोश खोब्रागडे तालुकाध्यक्ष व तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले तथा प्रसिध्दी प्रमुख वीरेंद्र मेश्राम ऑल इंडिया पँथर सेना तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.