देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांना डॉ श्रीकांत बनसोड यांचे जाहीर आवाहन…..

देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांना डॉ श्रीकांत बनसोड यांचे जाहीर आवाहन…..

स्वावलंबी शेतकरी आता नेहमीच परावलंबी वाटतो ,
उत्पादन खर्च आवाक्याबाहेर जन , आणि उत्पादन क्षमता बिन भरोष्याची . कधी बियानांमध्ये फसवणूक तर कधी निसर्गाचा रोष, कधी शेतमजुरांच्या रोष्यास बळी तर कधी शासनाच्या निर्णयांचा फटका…… वाढलेले डिझेल चे भाव, वाढलेली मजुरी, आणि बे भावाने करावी लागणारी मालाची विक्री.. कुटुंब चालविण्यासाठी करावी लागणारी कसरत… लग्न कार्य ह्या मुळे शेतकरी कुटुंबाच्या घराची कवेलू सुद्धा बदलत नाही तेही वर्षानुवर्ष . सरकारच्या उदासीन धोरणांनी होतें गळचेपी……. म्हणुन स्वत्रात्याच्या ७५ वर्ष लोटूनही अजूनही शेतकऱ्याच्या शेतीत पाणी जिरत ना पाणी मुरत……… पाप कर्माने पाणी दुसरीकडेच मुरते.
नापिकी , निसर्गाचा तडका ,आणि सुलतानी सरकार यात पार चीपून जातो तो शेतकरी…….सरकार बडलत असतात…..
माञ परिस्थीती बदलत नाहीआता शेतकरी हुशार झाला पाहिजे. त्यांनी स्वतचं फुटबॉल होऊ देवू नये.. कुणीही यावे आणि वापर करून जावे.
तुमचा कुणीही कैवारी नाही…
आव आणत असेल तरीही…….
स्वतःची लढाई स्वतः लढा …… आपन आज पर्यंत खूप नेते निर्माण केले……..
तरीही आपली परिस्थिती बदलली नाही हे लक्षात ठेवा……..
स्वतःवर ताबा मिळवा..
सरकार कधीच तुमचा माय बाप होऊ शकत नाही…………
झाला असता तर येवढे परिस्थिती शी लढावं लागले नसते….
तुम्ही ही कर्ज मुक्त झाले असते… तेही स्वतच्या भरोष्यावर……

तुम्हाला तुमच्या जमिनी बे भाव व्यापाऱ्यांना विकावे लागते या सारखी दुर्देवी गोष्ट ती कोणती .?तुमच्या जमिनीच्या विक्रीवर दलाल मोठे झाले ,पण विक्री करूनही तुमचा संसार उघड्यावर च आहे हे ही विसरू नका…

लेखक – डॉ. श्रीकांत बन्सोड वडसा