भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावे

            भंडारा दि. 18 : सन 2023-24 या कालावधीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचे अर्ज दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत स्विकारण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

तरी अनुसूचित जाती व नवबोध्द घटकातील विद्यार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे (जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, 10 वी, 12 वी किंवा पदवी परिक्षेचे गुणपत्रक, महा. बोनाफाईड सर्टिफिकेट, बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी) महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र आदी) इत्यादी कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जिल्हा परिषद चौक, भंडारा या कार्यालयात दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यत अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.