सत्ताकारणाऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या-हेमंत पाटील

सत्ताकारणाऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या-हेमंत पाटील

मुंबई, ११ जुलै २०२३

राज्यात गेल्या चार वर्षांपासून राजकीय पक्षांच्या सरमिसळीतून निर्माण झालेल्या राजकीय स्थिती मुळे सर्वसामान्य नागरिकांची वाताहात होतेय. खऱ्या अर्थाने आता नागरिकांना विकासकामांसाठी आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे,असा उपरोधक टोला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी लगावला. सत्ताकारणाऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे,असे आवाहन देखील यानिमित्ताने त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे.

राजकीय चढउतारामुळे आता स्वबळावर राज्यात सत्तेवर येणे कुठल्याही पक्षाला शक्य नाही.कदाचित हेच लक्षात आल्याने फोडाफोडीचे राजकारण आणि मुळ मुद्दयांवरून लक्ष भरकटवण्याचे काम केले जात असल्याचे पाटील म्हणाले.पंरतु, फोडाफोडीच्या राजकारणामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.राज्यातील बळीराजाची स्थिती बिकट झाली आहे.शेतकर्यांना अस्मानी संकटासह सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागले.बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नाराजी आहे.महागाईने जनता होरपळून निघाली आहे. या सर्व प्रश्नांकडे सरकारसह इतर राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे,असा दावा पाटील यांनी केला.आता सर्वसामान्यांना स्वत:ची आर्थिक उन्नती करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. राजकारणापासून अलिप्तता आणि तटस्थता ठेवून विकास साधावा लागेल.यासाठी सर्वसामान्यांना सर्वच राजकीय पक्षांवर अप्रत्यक्षरित्या दबाब आणावाच लागेल, असे देखील पाटील म्हणाले.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारा

राज्यातील ओबीसी बांधवांची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी संघटनेची आहेच.या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी आता वेगाने पावले उचलली पाहिजे.मध्यंतरी शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात