जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

गडचिरोली, दि.22: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे सन 2023-24 या सत्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली मुख्यालयीन जिल्हास्तर युवा महोत्सवाचे व्यापक स्वरुपात व अधिका अधिक युवकांचा सदर महोत्सवामध्ये सहभाग असावा व महोत्सवाला व्यापकता यावी शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचना नुसार जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 28 नोव्हेंबर, 2023 ला जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, गडचिरोली येथे सकाळी 09.00 वाजता आयोजीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
युवा महोत्सव आयोजनामागील उद्देश युवकांचा सर्वांगिन विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सप्तकलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मीता वाढील लागणे, करीता युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
तसेच सदर युवा महोत्सव हा जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजीत करण्यात येत असतो. सन 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरावर युवा महोत्सवात सहभागी युवकांची कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये खालील कलाप्रकार सामाविष्ठ आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 1. समुह लोकनृत्य, 2. वैयक्तिक सोलो लोकनृत्य, 3. लोकगीत, 4. वैयक्तिक सोलो लोकगीत. कौशल्य विकासमध्ये 1. कथा लेखन, 2. पोस्टर स्पर्धा, 3. वत्कृत्व स्पर्धा (इेग्रजी व हिंदी),4. फोटोग्राफी. संकप्लना आधारीत स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी -1. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर,2. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान. युवा कृती या कार्यक्रमाअंतर्गत 1. हस्तकला, 2. वस्त्रोद्योग,3. ॲग्रो प्रोडक्ट.
उपरोक्त सर्व बाबींच्या जिल्हास्तरावर कलाप्रकारानुसार स्पर्धा आयोजीत झाल्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त करणारे युवक-युवती / संघ यांना विभागस्तरावर आयोजीत विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीत कार्यालयाच्या वतीने प्रवेशअर्जासह संघ / युवक युवतींना पाठविण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये युवक युवती चे वय 15 ते 29 या वयोगटातील राहील. कमी अधिक वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येणार नाही. तसेच युवा महोत्सवामध्ये सहभागी हेणारे युवक युवती हे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे राहील. तसेच संघ असल्यास शाळेचा / महाविद्यालयाचा / संस्थेचा प्रवेशअर्ज युवक युवतीच्या नावासह व जन्मतारखेसह व निवासाच्या पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली dsogad2@gmail.comया इ-मेल वर सादर करावे व इ-मेल वर सादर केलेल्या दस्ताऐवजाची मुळ प्रत जिल्ह क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. 27/11/2023 पर्यंत सादर करणे अनिवार्य असेलकिंवाhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfRoPbZ_U9pap9SU8FwQ6TC1d1nchZVywF8a6CjZs2xPnogw/viewform?usp=sharing या लिंकवर आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करत येईल.
जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्या युवक युवतींकरीत यावर्षीपासुन प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणाऱ्या वैयक्तिक / सांघिक कलाप्रकारानुसार रोख बक्षिसे कार्यालयाच्या वतीने देण्यात येतील. तसेच सहभागी युवक युवतींना कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
तरी जिल्ह्यातील विविध संस्था / विविध शाळा / विविध महाविद्यालये / कला क्षेत्रात कार्यरत विविध संस्था / कृषी महाविद्यालय / अध्यापक महाविद्यालय / औद्योगीक प्रशिक्षण संस्था / तंत्रशिक्षण महाविद्यालय व जिल्ह्यातील विविध युवक युवती यांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दि. 27/11/2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा व आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा व अधिक माहितीकरीता एस.बी. बडकेलवार, दुरध्वनी क्रमांक 9503331133 यांचेशी संपर्क साधावा. असे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी आवाहन केले आहे.