मनपाच्या वतीने शहरात विविधांगी जनजागृती शासकीय योजनांची माहीती, मतदान जनजागृती, लसीकरणाचा लाभ

मनपाच्या वतीने शहरात विविधांगी जनजागृती शासकीय योजनांची माहीती, मतदान जनजागृती, लसीकरणाचा लाभ

चंद्रपूर २ डिसेंबर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने बचत गटाच्या महिलांसाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम दरदिवशी घेण्यात येत आहेत. शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती, मतदार नोंदणी अभियानाची माहिती देणे तसेच कोरोना लसीकरण करणे असे अनेक उपक्रम या माध्यमातुन राबविले जात आहेत.
रहमत नगर, अष्टभुजा वॉर्ड, नेहरू नगर, हिंगलाज भवानी वार्ड, बाबुपेठ इत्यादी भागात आतापर्यंत कार्यक्रम घेण्यात आले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात सदर कार्यक्रमांचं अंमलबजावणी केली जात असल्याने आर्थिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या नागरीकांना शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी अभियानाची माहिती तसेच जनजागृती केली जात असून सोबतच मनपा आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणसुद्धा सोबत राबविण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कर्मचारी व मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारीद्वारे सादर अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे.
या उपक्रमाद्वारे अत्यंत महत्वाची माहीती मिळत असुन लसीकरणही केले जात असल्याने अधिकाधिक नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.  राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कर्मचारी व मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते.