आरोग्य पर्यवेक्षीका सौ.रसिका मेश्राम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

आरोग्य पर्यवेक्षीका सौ.रसिका मेश्राम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

भंडारा दि. 2 :आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा येथुन दि.31 जानेवारी 2024 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य पर्यवेक्षीका सौ.रसिका दिपक मेश्राम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ दि.1 फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागात आयोजीत करण्यात आला.

            सत्कार समारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मनिषा साकोडे, प्रमुख पाहुणे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र धनविजय, श्री.दिपक मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आले.

            सत्कार कार्यक्रमात कु.प्रिया देशपांडे, कु.सरिता निर्वाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) बलराम तुरस्कर यांनी केले.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राजु थाटकर, प्रविण राठोड,  सुरेश चोपकर, विजय भिवगडे, राजकुमार तिजारे, नंदू नंदेश्वर यांनी सहकार्य केले.