हरविलेला व्यक्ती आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

हरविलेला व्यक्ती आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 07 : महाकाली कॉलरी, आंनद नगर येथील शब्बीर हनिफ शेख वय 37 वर्ष ही व्यक्ती दि. 20 जुन 2023 रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेले. सदर व्यक्तीचा नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

 

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

 

वय 37 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फूट 6 इंच, चेहरा लांबट, नाक सरळ, सडपातळ बांधा, अंगात पांढऱ्या रंगाचा जिन्स पॅन्ट,गळयात काळा रंगाचा स्कार्प, पायात पांढऱ्या रंगाची चप्पल परिधान केलेली आहे. सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस स्टेशन, चंद्रपूर शहर च्या वतीने करण्यात आले आहे.