भंडारा : शासकीय वसतीगृहांसाठी इच्छुक इमारत मालकाकडून प्रस्ताव आमंत्रित

शासकीय वसतीगृहांसाठी इच्छुक इमारत मालकाकडून प्रस्ताव आमंत्रित

भंडारा, दि.22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांचे अधिनस्त मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहासाठी इच्छुक इमारत मालकांनी प्रस्ताव दाखल करावेत.

 लाखनी येथे मुला व मुलींच्या दोन वसतीगृहांकरीता प्रत्येकी शंभर निवासी क्षमतेची तसेच भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, भांडारगृह, स्वच्छतागृह इत्यादी बाबींची किमान पात्रता पुर्ण करणाऱ्या लाखनी नगरपंचायत क्षेत्र किंवा 3 कि.मी. लगतच्या परिसरातील इच्छुक इमारत मालकांकडून इमारत भाड्याने देण्याकरिता प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, भंडारा यांनी मागविले आहे.

सदर इमारतीकरिता भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग, भंडारा यांचे भाडे निश्चितीच्या अधिन राहील. संपूर्ण माहिती व प्रस्तावाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावे, असे सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण सुकेशीनी तेलगोटे यांनी कळविले आहे.