10 ऑगस्ट रोजी आयटीआय मधील निर्लेखित साहित्य विक्रीकरीता जाहीर लिलावाचे आयोजन

10 ऑगस्ट रोजी आयटीआय मधील निर्लेखित साहित्य विक्रीकरीता जाहीर लिलावाचे आयोजन

Ø खरेदीधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 1 ऑगस्ट : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायाची कालबाह्य झालेली निर्लेखित अवजारे, सयंत्रे व साहित्य, उपकरणे, संगणक आहे, तशाच अवस्थेत विक्री करण्यासाठी बुधवार, दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड रोड शिवाजीनगर, ब्रह्मपुरी येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित रहावे. किमान तीन खरेदीधारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही. लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत, असे ब्रह्मपुरी,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य एन. डी. पिसे यांनी कळविले आहे.