जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीतील 100 रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर Ø  आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीतील 100 रिक्त झालेल्या

पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Ø  आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहन

भंडारा, दि.22 : राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायतीतील 100 रिक्त झालेल्या पदासाठी  पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 नोव्हेंबरपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी मत मोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. 27 डिसेंबर 2021 पर्यंत राहील.