मोहाडी पंचायत समिती निवडणूक सोडत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत 18 नोव्हेंबर रोजी

मोहाडी पंचायत समिती निवडणूक सोडत

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण

महिला आरक्षण सोडत 18 नोव्हेंबर रोजी

भंडारा, दि. 15 : भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत मोहाडी पंचायत समिती मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण महिलांकरीता सुधारित सोडत पध्दतीने आरक्षणाची कार्यवाही करण्याकरीता 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय मोहाडी येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची/ नागरिकांची सदर विशेष सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर रहावे. कोविड-19 साथीच्या आजाराचे अनुषंगाने विशेष सभेच्या स्थळी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 15 नोव्हेंबर 2021 च्या पत्रातील निर्देशानुसार मा. उच्च न्यायालय, औंरगाबाद खंडपीठात दाखल रिट याचिकेव्दारे शासनाने दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी पारीत केलेला महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3/2021 ला आव्हान देण्यात आले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण उक्त नमुद याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.पं.स.नि. महेश पाटील यांनी कळविले आहे.

आरक्षण सोडतबाबत असा राहील कार्यक्रम :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना (जिल्हाधिकारी) वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 16 नोव्हेंबर 2021. नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्ग तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडत काढण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर 2021 (संबंधित तहसीलदार) तर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 आहे.