भंडारा तालुक्यातील प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द Ø हरकती किंवा सूचना आमंत्रित

भंडारा तालुक्यातील प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द

Ø हरकती किंवा सूचना आमंत्रित

भंडारा, दि. 15 : जिल्हा परिषद भंडारा व त्याअंतर्गत येत असलेली भंडारा पंचायत समितीची आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 9 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून भंडारा तालुक्यात येत असलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. प्रारुप मतदार यादी 12 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर सूचनेव्दारे तहसील कार्यालय भंडारा व ग्रामपंचायतीचे ठिकाणी पाहणी व निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीसंदर्भात नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत तहसील कार्यालय, भंडारा येथे लेखी स्वरुपात सादर कराव्यात. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नाही. त्यानंतर अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून 24 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे तहसीलदार भंडारा यांनी कळविले आहे.