नियोजन विभागातर्फे दोन दिवसीय विभागस्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न

नियोजन विभागातर्फे दोन दिवसीय विभागस्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न

दोनशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग

          भंडारा, दि.31:जिल्हा नियोजन विभागातर्फे  गेल्या  28 त व 29 ऑक्टोबर रोजी शिवाजी क्रीडा संकुलात विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्यात. विभागातील साधारण 200 वर अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते. शनिवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान स्पर्धांना सुरवात झाली.

     त्यामध्ये या क्रीडा स्पर्धांच्या उदघाटनाला भंडारा विधानसभा क्षेत्राचे  आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती.श्री. भोंडेकर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले . जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,यांच्यासह अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे,मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी कमलाकर रणदिवे हे उपस्थित होते.

         विभागातील सहा जिल्हयातील अर्थ व सांख्यिकी व नियोजन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते .उदघाटनपर कार्यक्रमात  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह सरिता मु-हेकर, सहसंचालक ,विदर्भ कोकण मंडळ ,उपायुकत नियोजन धनंजय सुटे,  आदींनी मार्गदर्शन केले.वैयक्तिक तसेच सांघिक सामूहिक क्रीडा स्पर्धा यावेळी पार पडल्यात.

          खेळामुळे सकारात्मक भावना निर्माण होऊन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या  कार्यक्षमतेत नक्की वाढ होईल असा विश्वास यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला. तसेच नियोजन समीती भंडाराने आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील पायाभुत सुविधांच्या  आधुनिकीकरणासाठी  निधी मंजूर झाल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आयुष्यात सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यालयीन कामकाज करतांना येणा-या तणावाचा सामना करण्यासाठी  खेळांचा चांगला उपयोग होत असतो,असे त्यांनी सांगितले.तसेच या क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडुंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

         सहसंचालक मिलींद नारिंगे, अर्थ व साख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय,नागपूर सहसंचालक श्रीमती.सरिता मुऱ्हेकर विदर्भ विकास मंडळ नागपूर, यांनी देखील या उत्कृष्ट आयोजनाबद्दल भंडारा नियोजन विभागाचे कौतुक केले .40 हून अधिक प्रकारचे खेळ या स्पर्धेमध्ये होते.यावेळी उपस्थितांनी  क्रीडा शपथ घेतली.

        क्रीडा स्पर्धांच्या समारोपाला मुख्य अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम उपस्थित होते.शारिरीक व मानसिक स्वास्थासाठी खेळासोबत सांगड घालणे या धकाधकीच्या आयुष्यात गरजेचे असल्याचे श्री.सोयाम यांनी सांगितले.तर श्री.मतानी यांनी सर्वानी खेळात दररोज सातत्य ठेवावे .खेळाने सांघीक भावना वाढीस लागत असल्याचे मार्गदर्शनात सांगितले.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.