आरक्षण सोडतीबाबत हरकती व सुचना असल्यास कळविण्याचे आवाहन

आरक्षण सोडतीबाबत हरकती व सुचना असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर : जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमधील  नागरिकांचा  मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी  निश्चित केले आहे. सदर आरक्षण सोडतीबाबत काही हरकती व सूचना असल्यास शुक्रवार, दि. 12 नोव्हेंबर ते मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत संबंधित नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी बुधवार दि. 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत घेण्यात येईल.

तरी, आरक्षण सोडतीबाबत काही हरकती व सूचना असल्यास संबंधित नगरपंचायत कार्यालयात पाठविण्यात याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.