ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना क्रीडागणासाठी निधी वितरीत जिल्हा क्रीडा अधिकारी आवाहन

ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना क्रीडागणासाठी निधी वितरीत जिल्हा क्रीडा अधिकारी आवाहन

         भंडारा,दि.18 : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरणानुसार जिल्हयाच्या ठिकाणी विविध खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आलेली आहे.जिल्हा क्रीडा संकुल भंडारा करीता आतापर्यत 8 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले असून विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आलेल्या असून उर्वरीत 1 कोटीच्या अधिन राहून सिंथेटीक ट्रॅक,जतरण तलाव अपग्रेडेशन करणे,डोम टाईम मल्टीपरपज हॉल,योगा स्टेज शेडसह,ओव्ह हेड टँक,क्रीडा साहित्य,इत्यादी सुविधा निर्मितीचे काम सुरु आहे.

       शासन  निर्णय क्र.2019/प्र.क्र.92/क्रीयुसे-1,दि.23.3.2022 च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा क्रीडा संकुल करीता 25 कोटी रुपये मंजूर झाले असून 4 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त होणार आहे.या निधीतून अद्यावत क्रीडा सुविधा तयार करुन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यास सहायता मिळेल.

        तसेच भंडारा जिल्हयात क्रीडा संस्कृती रुजविणे व क्रीडेचा प्रचार,प्रसार करुन राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याच्या हेतूने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत क्रीडांगणाचा विकास व्यायामशाळाचा विकास व युवक कल्याण योजनेतून आवश्यक क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.

        सन 2023-24 या आर्थिक वर्षात व्यायामशाळा विकास योजनेकरिता 225.00 लक्ष निधी प्राप्त झाला असून जवळपास 45 ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना ओपन जिम व व्यायाम साहित्य,वितरीत करण्यात येणार आहे.

           तसेच क्रीडांगण विकास योजनेकरीता 275.00 लक्ष निधी प्राप्त झाला असून 45 ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना क्रीडागण विकासीचे कामे करण्याकरीता निधी वितरीत केलेला आहे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.