नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या रेती ट्रक वर कार्यवाही करा – राष्ट्रवादी

सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या (अजितदादा पवार गट) वतीने नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या रेती ट्रक वर कार्यवाही करण्याची मागणी
सिंदेवाही प्रतिनिधी :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बहुतांश रेती घाटाचे लिलाव झाले असून रेती उपसा सुरू झालेला आहे.घाटावरून रेतीच्या उपसा करून बाजूला रेती जमा करीत ढिगार्‍यावरून पादन रस्त्याने रेती वाहतूक सुरू असून त्या रेती वाहतुकीमुळे पांदन रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
सिंदेवाही तालुक्यात सरडपार या रेती घाटाचा निलाव कंत्राटदारांनी घेतला असून तेथील रेतीचा उपसा सुरू आहे. परंतु, सरडपार या भागात उपसा करून रेती साठा दुसऱ्या ठिकाणी करून तिथून ट्रकद्वारे रेती वाहतूक केली जात आहे. ट्रकच्या आवागमनमुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरी अशा नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील नागरिक करीत आहेत.याची दखल घेत सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) वतीने त्वरित दखल घेण्यावाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष दामोधर नन्नावार, प्रदीप लांजेवार, राजु वानखेडे,आरिफ शेख, परसराम गोरलावार,राजेश्वर गायकवाड,उमाजी नन्नावार, रमेश नागपूरे,वामन गायकवाड,राजू ताडाम, जगदीश मेश्राम, मनोज नागपुरे आदी उपस्थित होते