तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन Ø सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन

Ø सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर : दि. 16 व 17 नोव्हेंबर 2021 रोजी  सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असून पोर्टलवर माहिती भरावयाची आहे.  तसेच राशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने या सर्व कामाकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे व पुरावे पासपोर्ट फोटोसह तृतीयपंथी व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयात दि.16 व 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमो