खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

चंद्रपूर दि.8 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 33 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी  दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी.

शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपले आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक आदी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची नियोजित वेळेत विक्री करावी. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.