मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ उपक्रमात ६१६ विद्यार्थ्यांनी घेतली लस

मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ उपक्रमात ६१६ विद्यार्थ्यांनी घेतली लस


चंद्रपूर, ता. ८ :शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेअंतर्गत २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विशेष लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात एकूण ६१६ विद्यार्थ्यांनी लस घेतली.

दिवाळीपूर्वी शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली होती. त्यामुळे १८ वर्षावरील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य  मोहीमेअंतर्गत लसीकरण शिबिर घेण्यात आले. सोमय्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दररोज शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात डॉ. खत्री महाविद्यालय, एफईएस गर्ल्स काॅलेज, जनता महाविद्यालय, जनता शिक्षण महाविद्यालय, जनता अध्यापक विद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, साई पॉलिटेक्निक, रेनेसान्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, दाताळा रोड, डॉ. आंबेडकर कॉलेज, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, एसपी लॉ कॉलेज तुकूम, शासकीय आयटीआय महाविद्यालय आदी महाविद्यालयाचा समावेश होता. यावेळी महाविद्यालयातील लसीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेतले.