धारदार तलवारीसह अन्य हत्यारांचा साठा जप्त/ एल.सी.बी. ची कारवाई

धारदार तलवारीसह अन्य हत्यारांचा साठा जप्त अहमदनगर शहर परिसरातील टोळीवर एल.सी.बी. ची कारवाई

सय्यद मुहाफिज शहर प्रतिनिधी अहमदनगर

अहमदनगर – धारदार तलवारीसह हत्यारांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. अहमदनगर शहरातील भिंगार नाला रोडवरून एक इसम तलवारीसह शस्त्रसाठा घेऊन येणारं असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार नगर शहरातील भिंगारनाला येथे सापळा लावून हत्यार घेऊन येणाऱ्या साबीर शेखला पोलिसांनी अटक केली आहे.मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या साबीर शेखला भिंगारनाला परिसरात अटक करण्यासाठी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना साबीर शेख सोबत घटनास्थळी त्याचे अन्य साथीदार देखील दिसले त्याचवेळी पोलिसांनी सगळ्यांवरच धाड टाकली मात्र त्यातुन दोन जण फरार होण्यात यशस्वी झालें परंतु पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपी मध्ये साबीर शेख, समी शेख , अजहर शेख या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 1 तलवार सह तब्बल 12 रेम्बो चाकू व अन्य हत्यार ताब्यात घेतली आहे. अटक केलेले आरोपी हें मुकुंदनगर परिसरातील राहणारे असून त्यांच्यावर भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तलवारीचा साठा आणण्यात येत आहे? गेल्या काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांनी कापड बाजार येथील महावीर स्टोअर्स मध्ये छापा टाकून तलवारी जप्त केल्या होत्या. खरतर शहरातील ओंकार भागानगरे या युवकाची हत्या देखील तलवारीने वार करूनच करण्यात आली होती आणी त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या तलवारी नेमकं कुठून आणी कश्यासाठी आणण्यात येत आहे याबाबत पोलीस यंत्रणा कसून तपास करण्याची गरज आहे.वास्तविक पाहता तलवारी आणणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सरकारने देखील या कायद्यात सुधारणा करून आरोपीला कठोर कारवाई व्हावी अशी तरतुद करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र तसं होतांना दिसत नाही आज अहमदनगर शहरात खुलेआम पणे तलवारी मागवील्या जात आहेआणी याच तलवारीने परवा एका तरुणाचा जीव घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारनेच बेकायदेशीर हत्यार बाळगनाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करने गरजेचे आहे.दरम्यान मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच यामध्ये आणखीन मोठी साखळी आहे की नाही,आणलेल्या तलवारी कोणाला विकण्यात आले की नाही,हें तलवारी कुठून आणल्या या संदर्भात कसून तपास सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे.