हयातीचे प्रमाणपत्र बँकेमार्फत सादर करा

हयातीचे प्रमाणपत्र बँकेमार्फत सादर करा

भंडारा, दि. 27 : निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्ती वेतन नियमित सुरू ठेवण्यासाठी बँकेमार्फत हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. www.jeevanpraman.gov.in या संकेतस्थळाव्दारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कोषागार, उपकोषागार तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर व्दारे दाखल करता येतील किंवा बँकेमार्फत हयातीचा दाखला 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावा. प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर 2021 चे निवृत्तीवेतन प्रदान केल्या जाणार नाही, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.