पोर्टलवर ई-पीक पाहणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी 31 जानेवारीपूर्वी करावी

पोर्टलवर ई-पीक पाहणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी 31 जानेवारीपूर्वी करावी

भंडारा दि. 23 : आधारभुत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयातील 7 तालुक्यातील ई-पीक पाहणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी महसुल विभागाकडुन प्रमाणित करुन सदर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद करुन धान खरेदी करण्यास उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने NEML पोर्टलवर ई-पीक पाहणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी दि. 31/01/2024 पुर्वी करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे.

त्यानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्याकरिता शासनाकडील पत्रान्वये दि.३१.०१.२०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तसेच ई-पीक पाहणी बाकी असल्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदतीआधी जाऊन नावाची नोंदणी करून घ्यावी.

सबब किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीकरिता 1) धान लागवडीखालील क्षेत्राची (पीक पेरा) नोंद तलाठ्याद्वारे ऑफलाईन पद्धतीने घेऊन सदर प्रमाणपत्र NeML पोर्टलवर अपलोड गरजेचे आहे. 2) आधार कार्ड 3) बैंक पासबुकची झेरॉक्स, 4) मोबाईल क्रमांक यासह ऑनलाईन शेतकरी नोंदणी करतांना प्रत्यक्ष शेतकरी नोंदणी केंद्रावर हजर असला पाहिजे व नोंदणी करतांना शेतकऱ्यांचा लाईव फोटो (Live Photo) घेऊनच शेतकऱ्यांची नोंदणी करावयाची असून सदरील कागदपत्रासह नोंदणीस वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदतीआधी जाऊन नावाची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

            भंडारा जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हाहन करण्यात येते की, आधारभुत किंमत धान खरेदी योजना खरिप पणन हंगाम 2023-24 मध्ये शासन निर्णयानुसार धान खरेदी करण्याकरिता दि.31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विक्रीस न्यावे व आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सबएजंट संस्थांनी मुदतीत धान खरेदीपासून शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. धान खरेदीपासून शेतकरी वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची राहील, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, भंडारा तर्फे करण्यात येत आहे.