आदिवासी उमेदवारांनी कर्जयोजनेसाठी अर्ज  करावेत

आदिवासी उमेदवारांनी कर्जयोजनेसाठी अर्ज  करावेत

        भंडारा, दि.23 : शबरी आदिवासी  महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरिता गोंदिया व भंडारा जिल्हयातील  इच्छुक लाभार्थीनी  अर्ज सादर करण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक,शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. कार्यालय, देवरी यांनी कळविले आहे.

       या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज शाखा कार्यालय,देवरी दुधनाग भवन,अग्रेसन चौक,आमगाव रोडा,देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे उपलब्ध आहेत.तरी सदर व्यवसायाचे प्रस्ताव संपुर्ण कागदपत्रासह 31 ऑगस्टपर्यत देवरी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे,या नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.

       या अर्ज योजनेतून स्वयंसहायता बचत गट योजना 5 लक्ष रुपये,व प्रवासी वाहन 10 लक्ष रुपये,तसेच मालवाहु वाहन व्यवसाय 10 लक्ष रुपये व ऑटो रिक्षा व्यवसाय 2.40 लक्ष व एकुण 6 लक्षांक प्राप्त झाला असून उद्दीष्टांच्या प्रमाणात अंतीम मंजूरीसाठी सादर करावयाचे आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा 95 टक्के सहभाग तर लाभार्थांचा 5 टक्के सहभाग राहणार आहे.

     या  कर्जयोजनेसाठी व्यवसायाचे प्रस्ताव सादर करताना जातीचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,टी.सी. व उत्पन्नाचा दाखला,शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे,आदिवासी विभागाचे नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र,व अनुभव प्रमाणपत्र,प्रकल्प अहवाल,रेशन कार्ड,व्यवसायाचे कोटेशन,ड्राईव्हींग लॉयन्सस वाहन करिता,लाभार्थी व एक जामीनदाराचा 7/12 किंवा घराचा 8 अ नमुना,दोन पास फोटो,बॅकेचे कर्ज नसल्याचे दाखले व ग्रामपंचायत व नगर पंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र,तसेच इत्यादी कागदपत्रे फाईल सोबत जोडणे आवश्यक आहे.

      गोंदिया व भंडारा जिल्हयातील इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ नाशिक शाखा कार्यालय दुधनाग भवन,अग्रेसन चौक,आमगाव रोड देवरी,तालुका देवरी जिल्हा गोंदिया यांनी कळविले आहे.

     अर्जाची किंमत 10 रुपये असून लाभार्थ्यांनी स्वताचे ओळखपत्र आधार कार्ड, दाखवून व्यवसायाचे अर्ज प्राप्त करुन घ्यावी, यांची संबंधितानी नोंद घ्यावी,तसेच अर्ज पाठविताना प्रतिनिधी पाठवू नये,असे आवाहन  महामंडळाने केले आहे.