सर्व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सूचना

सर्व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सूचना

 भंडारा,दि.11:- सर्व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचे जन्म तारखेचे शासकीय पुरावे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट व सेवा पुस्तकाचे पृष्ठावर जन्म तारखेची नोंद आहे अशी प्रत कोषागार कार्यालय, भंडारा येथे छायांकित प्रत सादर करावी. जेणेकरून सातवे वेतन आयोगानुसार वयाचे 80 वर्षे झालेल्यांना निवृत्तीवेतनात वाढ करणे शक्य होईल. या बाबत कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी रमेश कुमरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.