जिल्हास्तरीय ऋण प्रचार व प्रसार मेळाव्याचे 14 ऑक्टोबरला आयोजन

जिल्हास्तरीय ऋण प्रचार व प्रसार मेळाव्याचे 14 ऑक्टोबरला आयोजन

 भंडारा,दि.11:- अग्रणी जिल्हा व्यवस्थापक भंडारा यांचेकडून सणासुदीच्या काळात कर्ज पुरवठा वाढविण्याकरिता व कर्ज योजनेची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याकरिता (Credit Outreach Campaign) ऋण प्रचार, प्रसार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 14 ऑक्टोबर 2021 रोजी आरसेटी (RSETI) भंडारा (मनरो शाळेच्या बाजूला) येथे सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम जिल्हास्तरीय आहे व या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रत्येक बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी व संबंधित शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहणार असून बँकेच्या कर्ज योजना संबंधी माहिती, मार्गदर्शन देण्याकरिता त्यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी ऋण प्रचार व प्रसार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी केले आहे.