क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी संपर्क साधावा

क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी

इच्छुक खेळाडूंनी संपर्क साधावा

        भंडारा,दि.7: आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयातच मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस् इन्स्टीट्यूट यांचे संयुक्त वतीने बॉईज स्पोर्टस् कंपनी पुणे येथील प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी खालील प्रमाणे कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.
          जिल्हास्तरीय चाचण्या 12 व 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे. याकरीता डायव्हींग या क्रीडा प्रकारात वय मर्यादा 8 ते 10 वर्ष राहील. तसेच ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टींग, ट्रायथलॉन व आर्चरी या क्रीडा प्रकारात वय मर्यादा 10 ते 14 वर्ष राहील.  12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता तलवारबाजी, बॉक्सींग, कुस्ती, आर्चरी, डायव्हींग, वेटलिफ्टींग व ट्रायथलॉन या क्रीडा प्रकाराची चाचणी होणार आहे तर 13 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता ॲथलेटीक्स या क्रीडा प्रकाराची चाचणी होणार आहे.
         जिल्ह्यातील इच्छुक शालेय विद्यार्थ्यांनी 8 ते 14 वयोगटातील सदर क्रीडा नैपुण्य चाचणीकरिता आवेदन अर्ज 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करणे बंधणकारक आहे. अधिक खेळ निहाय माहितीसाठी (डायव्हींग, वेटलिफ्टींग, ट्रायथलॉन व ॲथलेटीक्स) मनोज पंधराम 9579125980, (बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी व आर्चरी) भोजराज चौधरी 9850789180 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.