शासकीय कार्यालय व विश्रामगृहे परिसरात सभा घेण्यास निर्बंध

शासकीय कार्यालय व विश्रामगृहे परिसरात सभा घेण्यास निर्बंध

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय आवारात राजकीय कामासाठी रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक राजकीय घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे.