आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्काराची निर्मिती होते.खासदार अशोक ‌नेते याचे प्रतिपादन

आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्काराची निर्मिती होते.खासदार अशोक ‌नेते याचे प्रतिपादन

अ.भा.श्री. गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा- अंतरगांव (टोला) येथे ५५ वा पुण्यस्मरण महोत्सव सोहळा निमित्त भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन…

सावली :- अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा – अंतरगांव( टोला) ता.सावली जि.चंद्रपुर या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या. पुण्यस्मरण महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भव्य खंजेरी भजन स्पर्धचे आयोजन करण्यात आले.या पुण्यस्मरण महोत्सव सोहळात संगीतमय, ग्रामगीता, तत्वज्ञान, प्रचार,प्रसार भव्य खंजेरी स्पर्धा दि.०८ जानेवारी ते ०९ जानेवारी २०२४ पर्यंत भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे समारोपीय, गोपालकाला व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आज शेवटचा दिवस समारोपीय गोपालकाला व बक्षीस वितरण या कार्यक्रमाला गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गुरूदेव भक्तांना मार्गदर्शन करतांना आजच्या काळात धार्मिक,अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असून गुरूदेव सेवा मंडळामुळे शिस्तपणा व प्रेमभावनेची शिकवण पाहायला मिळते, वंदनीय राष्ट्रसंतांच्या आचार विचाराबरोबरचं थोर महापुरुषांचे विचार सुद्धा अंगीकारले पाहिजे,
तुकडोजी महाराजांनी एका अभंगात म्हटलं माणूस द्या !मज माणूस द्या ! माणसानी माणसासारखं वागलं पाहिजेत, माणसाने माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाचे विचार घराघरात पोहचवत राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज आहे.अशा आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्काराची निर्मिती होते.असे मत खासदार अशोक नेते यांनी ५५ व्या पुण्यस्मरण महोत्सव सोहळ्या निमित्ताने भव्य खंजेरी भजन स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन केले.

यावेळी गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सुद्धा गुरुदेव भक्तांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

याप्रसंगी श्री. गुरुदेव मंडळाचे आयोजक मंडळानी मान.खासदार अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे तसेच माजी जि.प. अध्यक्ष सोमया पसूला यांचे शाल श्रीफळ व डोक्यावर गुरुदेव टोपी देत पुष्पगुच्छ देऊन मानसन्माने स्वागत केले.

याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी.जि.प.अध्यक्ष सोमया पसूला,अंतरगांवचे सरपंच कविंद्र लाकडे,माजी सरपंच तथा सामाजिक नेत्या उषाताई भोयर,भाजपाच्या जेष्ठ नेत्या छायाताई चकबंडलवार, पो.पा.छगन उंदिरवाडे,तंटामुक्ती अध्यक्ष बाळु सहारे,भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख जितेंद्र म्हस्के, गुरूदेव मंडळाचे अध्यक्ष शिशुपाल ठाकरे, भाजपा कार्यकर्ते नरेश हजारे, अ.भा.श्री.गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य गण तसेच मोठया संख्येने गुरूदेव भक्त महिला बंधुभगिनी, युवक वर्ग , बालगोपाल उपस्थितीत होते.