ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरीता  उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरीता  उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.1 ऑक्टोंबर : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची आवश्यकता आहे. यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिल मधील ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्सकरीता एनटीसी (आयटीआय) फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इत्यादी ट्रेड पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, हॉल क्रमांक 5/6 या कार्यालयात दि. 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत नोंदणी करीता प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.