चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप Ø संबधित संस्थानी विहीत वेळेत अर्ज सादर करावे

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप

Ø संबधित संस्थानी विहीत वेळेत अर्ज सादर करावे

चंद्रपूर दि. 6 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयास वरोरा व चिमूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच वरोरा व चिमूर येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता (सफाईगार) व सुरक्षा रक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जिल्हास्तरीय काम वाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने  या कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामाचे वाटप करण्यात येत आहे.

            सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून सदर कामाची सविस्तर माहिती जाणून घेत 13 ऑगस्ट 2021 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

विहित तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, बँकेच्या पासबुकची छायाप्रत, लेखापरीक्षण अहवाल, चालू असलेले सेवायोजन कार्ड, सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र, तसेच संबंधित सेवा सहकारी संस्था कार्यरत असावी, असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.