शासकीय मुलींचे निरीक्षण गृहाकरीता इमारत भाड्याने घेणे आहे Ø चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन

शासकीय मुलींचे निरीक्षण गृहाकरीता इमारत भाड्याने घेणे आहे

Ø चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 1 ऑक्टोंबर: शासकीय अपंग मुलांचे बालगृह ही संस्था शासन स्तरावरून बंद करून त्याऐवजी अधिक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह सुरू करणेबाबत शासन स्तरावरून सूचित करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह या कार्यालय-संस्थेकरीता चटई क्षेत्रफळ कमीत कमी 4000 चौ.फुट व जास्तीत जास्त 8000 चौ.फुट व मोकळी जागा, मुबलक पाणी,  पुरेसा सूर्यप्रकाश  व खेळती हवा असणारी इमारत भाड्याने घेणे आहे. सदर इमारत भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारीत केलेल्या दरानुसार देण्यात येईल.
तरी, पुढील वर्णनाची इमारत उपलब्ध असल्यास संबंधितांनी अधिक्षक, एम. डी. कर्णेवार 9420087950,समुपदेशक एन.के.गाडगे 9421880950, लिपीक के.पी. खोब्रागडे  9420438824 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अधिक्षक, शासकीय अपंग मुलांचे बालगृह यांनी कळविले आहे.