भानापेठ वॉर्डातील सिमेंट काँकीट रस्त्याचे भूमिपूजन

भानापेठ वॉर्डातील सिमेंट काँकीट रस्त्याचे भूमिपूजन

चंद्रपूर, ता. १८ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने भानापेठ प्रभागात डॉ. कोलते ते दुर्गा टॉवर ते सम्राट चौक आणि दुर्गा टॉवर ते श्री. प्रल्हाद रस्से यांच्या घरापर्यंतसिमेंट काँकीट रस्ता विकसित करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन १८ सप्टेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते झाले.  
यावेळी स्थायी समिती सभापती रवि आसवानी, झोन सभापती खुशबु चौधरी, सभागृह नेता संदिप आवारी, भानापेठ प्रभागातील सर्वश्री नगरसेवक संजय कंचर्लावार, राजू अडपेवार, आशा आबोजवार, शितल कुळमेथे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिक बबन बांगडे, दीपक गवाल्पंछी, बबन विटेकर, श्रीराम वासेकर, गंगाधरराव चांदेकर, प्रतापसिंह चंदेल, विलासराव वेगिनवार संजयसिंह गवाल्पंछी, अनुप वेगिनवार, देवेंद्रसिंह गवाल्पंछी, प्रल्हादसिंह चंदेल, राजुभाऊ पचारे, प्रवीण बावणे, प्रवीण उरकुडे, रामजीत यादव, सौरभ वासेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यश बांगडे यांनी केले.