गणेश विसर्जन करतांना सतर्कता बाळगा – जिल्हाधिकारी संदीप कदम

गणेश विसर्जन करतांना सतर्कता बाळगा – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • मूर्तीला खोल पाण्यात घेऊन जाणे टाळावे

  • वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

  • जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा           

भंडारा,दि.18:- गणेशोत्सव शेवटच्या टप्प्यात आहे. उद्या (रविवारी) बाप्पांची मूर्तीचे विसर्जन होणार आहे. बाप्पांचे विसर्जन करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी-नाले इत्यादी ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे. तसेच धरणाचे पाणी देखील सोडण्यात आले आहे. यादरम्यान कुणीही नागरिक, भक्तगण बाप्पांच्या मूर्तीला खोल पाण्यात घेऊन जाणे टाळावे व कुठल्याही अप्रिय घटनेला भाग पडू नये. शक्यतो घरगुती मूर्तींचे विसर्जन घरी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टॅंक मध्येच करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

 यावेळेस गणेश विसर्जनादरम्यान आपण सर्वांना (प्रशासन आणि नागरिक) सजग राहून गणेश उत्सव आनंदाने साजरा करून बाप्पांना शेवटचा निरोप देणे आहे. संजय सरोवर मधील विसर्ग भंडारा येथे पोहचला असून परिस्थिती सामान्य आहे. नदीची पातळी ही ईशारा पातळी पेक्षा कमी आहे. असे असले तरी वैनगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात जाऊ नये. याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच मूर्ती विसर्जन करावे. नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

 यावेळेस सावध राहून गणेश विसर्जन करून कुठलीही अप्रिय घटना घडू देणार नाही असे संकल्प करू या असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. नदीच्या खोल पाण्यात मूर्ती विसर्जनाचा आग्रह धरू नये असेही त्यांनी सांगितले.