अमृत जल योजनेच्या कामासंदर्भात महापौरांनी घेतली दखल  

अमृत जल योजनेच्या कामासंदर्भात महापौरांनी घेतली दखल  

अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आयुक्त राजेश मोहिते यांचे निर्देश
 
नगरसेवक अनिल रामटेके यांना आत्मदहन इशारा मागे घेण्यासाठी विनंतीपत्र 

चंद्रपूर, ता. ३० :  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. १७ येथील अमृत जल योजनेचे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले. नगरसेवक अनिल रामटेके यांनी आत्मदहनाचा इशारा मागे घ्यावा, अशी विनंती मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केली आहे. अमृत अभियानाअंतर्गत सुरु असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

नगरसेवक अनिल रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. १७ मधील अमृतजल योजनेबद्दल तक्रार केली होती. मागणीच्या अनुषंगाने त्यांनी ३१/८/२०२१ रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या आमसभेत अमृत जल योजनाचे कॉन्ट्रक्टर यांना आमसभेत येण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी तातडीने बैठक घेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. १७ मधील अमृत अभियानाअंतर्गत सुरु असलेले पाणीपुरवठा योजनेचे कामाबाबत दखल घेण्यात आली असून, सदर कामास सुरुवात झाली आहे. तसेच वॉर्डातील इतर विकास कामाबाबतदेखील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आत्मदहन इशारा मागे घ्या, अशी विनंती आयुक्त राजेश मोहिते यांनी नगरसेवक अनिल रामटेके यांना केली.