बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी

बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी – धम्‍मप्रकाश जे. भस्‍मे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानस पुत्र तथा राज्‍यसभेचे माजी उपसभापती बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांची ९८ वी जयंती भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूर महानगर द्वारे उत्‍साहात साजरी करतांना आनंद होतो आहे. बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांनी आंबेडकरी चळवळीकरिता आपले संपूर्ण आयुष्‍य खर्ची घातले. तळागाळातील नागरिकांच्‍या उन्‍नतीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना प्रमाण मानुन त्‍यांनी आजीवन कार्य केले असे भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराचे  अनुसूचित जाती मोर्चा महानगर चे जिल्‍हाध्‍यक्ष धम्‍मप्रकाश भस्‍मे बोलत होते.

दि. २५ सप्‍टेंबर २०२३ रोजी आझाद बगिच्‍यामधील बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांच्‍या पुर्णाकृती पुतळ्याला भारतीय जनता पार्टी महानगर व अनुसूचित जाती मोर्चा, चंद्रपूरच्‍या वतीने  माल्‍यार्पण करुन त्रीवार वंदन करण्‍यात आले. यावेळी राहूल पावडे म्‍हणाले सामान्‍य जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावा याकरिता भारतीय संविधानाची मुल्‍य अत्‍यंत उपयुक्‍त आहे. यावेळी देशक खोबरागडे, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराचे जिल्‍हाध्‍यक्ष राहूल पावडे, रिब्‍पलीकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे जिल्‍हाध्‍यक्ष राजु भगत, भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर माजी महिला मोर्चा अध्‍यक्ष अंजली घोटेकर, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर ओबीसी मोर्चाचे अध्‍यक्ष विनोद शेरकी, माजी नगरसेविका सविता कांबळे, वंदना जांभुळकर, खुशबु चौधरी, मंडळ अध्‍यक्ष दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्‍लीवार, रवी लोनकर, चांद सय्यद, सागर भगत, राजेश थुल, स्‍वप्‍नील मुन, मोरेश्‍वर खैरे, अजय गणवीर, प्रलय सरकार, रेणुका घोडेस्‍वार, मोनिषा महातव, अमोल नगराळे, राहूल सुर्यवंशी, तुषार मोहूर्ले, आकाश खिरे, हर्ष महातव, मयुर आक्‍केवार, अमोल मत्‍ते यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.