चंद्रपूर : 17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 6 ऑगस्ट : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. सोमवार दि.16 ऑगस्ट 2021 रोजी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सदर महिला लोकशाही दिन  मंगळवार दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 11 ते 1 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, अशी प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे स्वीकारण्यात येईल. सदरील महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्वीकारण्यात येतील. तरी महिलांनी याबद्दलची नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  यांनी कळविले आहे.