राजर्षी छत्रपत्री शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत नागपूर विभागातील 39 विद्यार्थ्यांची निवड

राजर्षी छत्रपत्री शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत नागपूर विभागातील 39 विद्यार्थ्यांची निवड

गडचिरोली, दि.01: सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युतर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅकमध्ये परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकुण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये नागपूर विभागातील एकूण 38 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृती योजनेचा लाभ दिला जातो.या योजनेअंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि.26 ऑगस्ट 2022 नुसार राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून यात नागपूर विभागातील 38 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्यातून नागपूर विभागातील सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड परदेश शिष्यवृत्तीसाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये नागपूर जिल्हयातील एकूण 31 विद्यार्थी,चंद्रपूर जिल्हयातील एकुण 6 विद्यार्थी तर वर्धा जिल्हयातील 1 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग नागपूर, डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी अभिनंदन केले.