भंडारा : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक

शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी

भंडारा,दि.29:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट 2021 रोजी भंडारा जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. इयत्ता पाचवी चे 8 हजार 170 व इयत्ता आठवीचे 6 हजार 904 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून प्रिंट काढून घ्यावी. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावर चुक असल्यास ते दुरुस्त करून मुख्याध्यापकांनी शिक्का लावून सही करावी व पुराव्याचे कागदपत्र केंद्र संचालकाला द्यावे. या संबंधी काही अडचणी असल्यास गटशिक्षणाधिकारी यांचेशी सपंर्क साधावा. असे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.