भंडारा : जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 11 ऑगस्ट रोजी

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 11 ऑगस्ट रोजी

भंडारा,दि.29:- जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा-2021 जिल्ह्यातील 35 केंद्रावर 11 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर दिलेल्या कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.