chandrapur I लोकमान्य महाविद्यालय,वरोरा राष्ट्रीय सेवा योजना पथकाकडून कोरोना विरुद्ध निरामय भारत जनजागृती अभियान

लोकमान्य महाविद्यालय,वरोरा राष्ट्रीय सेवा योजना पथकाकडून कोरोना विरुद्ध निरामय भारत जनजागृती अभियान

लोकशिक्षण संस्था वरोडा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालय ,वरोरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाकडून कोरोना विरुद्ध निरामय भारत जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्याचेच एक पाऊल म्हणून जनसामान्यांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागात कोरोना बद्दल संरक्षणात्मक उपाययोजना पोहचाव्या यासाठी डिजिटल मंचावर (youtube) जागृती अभियानाअंतर्गत व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृती करण्याची संकल्पना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री शास्त्री यांनी मांडली आणि त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयीन स्वयंसेवकांना घर बसल्या जोडून या अभियानाची नांदी केली.या आधीही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून डिजिटल बॅनर च्या माध्यमातून लोकांपर्यंत संरक्षणात्मक उपाय आणि लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली,या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंग ,कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. जयश्री शास्त्री,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दीपक लोणकर व्हिडीओसाठी संकलक आणि संयोजनाचे काम करणाऱ्या डॉ.पल्लवी ताजने तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक
प्रकाश देवारकर, आचाल रेडी ,प्रीती दातारकर ,अनुराग पाटील ,श्रुती श्रीखंडवार, शुभम मांडवकर, जीवन चिडे,हर्षदा वासेकर,लक्ष्मी आडकिने, साक्षी ढवस,अंजली निखाडे यांनी जनजागृती अभियानात भाग घेतला.

प्रतिनिधी
प्रकाश देवारकर वरोरा