भंडारा : विशेष शिबीराव्दारे दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

विशेष शिबीराव्दारे दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

भंडारा, दि.28:- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पूणे अंतर्गत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कोविड लसीकरणाचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

आज 28 जुलै रोजी साकोली तालुक्यातील गोंड उमरी, एकोडी, खांबा, सानगडी, विर्सी या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण शिबीर घेण्यात आले. 22 जुलैला भंडारा, 26 जुलैला लाखांदूर, 27 जुलैला पवनी तालुक्यात विशेष शिबीराव्दारे लसीकरण करण्यात आले. 29 जुलै रोजी मोहाडी, 30 जुलै रोजी तुमसर व 31 जुलै रोजी लाखनी तालुक्यातील सर्व आरोग्य वर्धिनी केंद्रात दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण शिबीर अयोजित करण्यात आले आहे.

            या शिबीरात सर्व दिव्यांग बांधवांनी आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आशा कवाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे.