काजळसर- मोटेगाव बिटातील नागरे,वनरक्षकाची तात्काळ बदली करून विभागीय चौकशी करा.

काजळसर- मोटेगाव बिटातील नागरे,वनरक्षकाची तात्काळ बदली करून विभागीय चौकशी करा.

सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेने
मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या काजळसर-मोठेगाव बीटात गेल्या 3 वर्षापासून श्रीकृष्ण नागरे हे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत.
परंतु त्यांची गावातील लोकांसोबत वर्तवणूक चांगली नसल्यामुळे गावातील लोकांसोबत उदधट भाषेने बोलणे, शिवीगाळ करणे,त्यांच्या नोकरीच्या कामात हलगर्जीपणा आढळून येत असल्यामुळे तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बीटात प्रचंड प्रमाणात अवैद्य वृक्षतोड, व गौण खनिज उत्खनन झालेले आहे, शेत शिवारात वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरता आर्थिक देवाण-घेवाण करणे, काही लोकांसी हितसंबंध साधून आर्थिक देवाण-घेवाण करून त्यांना वहिवाटीसाठी वन अधिकारातल्या बीटातील जमिनी प्रदान करणे, अशा अनेक कारणांमुळे गाववाशीय जनता त्रस्त झाली आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.
मोठेगाव हे चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गाव असून आज पर्यंत असा कोणताच हेकेखोर वनरक्षक रुजू झालेला नाही. मात्र नागरे वनरक्षक हे जेव्हापासून काजळसर-मोठेगाव येथे नोकरीवर रुजू झाले तेव्हापासून त्यांची वागणूक गावकरी यांच्या विरोधात्मक आढळून आलेली आहे.
त्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या मागणीवरून सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेला निवेदन देऊन  नागरेच्या बदलीसाठी मदत करावी असे अर्ज आल्याने सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेने तात्काळ दखल घेत
काल दिनांक: 22/08/2021
शनिवारला सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष
अमोल सेवादास निनावे, सामाजिक कार्यकर्ते अजित दुर्गादास सुकारे व अन्य सदस्यांच्या उपस्थित मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, एन. आर. प्रवीण,
यांच्याकडे निवेदन देऊन नागरे वनरक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी तसेच विभागीय चौकशी लावून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली.
येणाऱ्या आठ दिवसात विभागीय चौकशी अथवा बदली न झाल्यास धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सामाजिक युवा ब्रीगेड संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.